Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विवेक आणि विद्युल्लता पंडित यांनी करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला!

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • संघटनेच्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी उसगाव येथे खास लसीकरण शिबिर आयोजित करणार- विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क दि.१२ मार्च : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. विवेक पंडित आणि संस्थापिका श्रीम. विद्युल्लता पंडित यांनी वसईतील जनसेवा रुग्णालया मध्ये कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही लस घेतली यावेळी जनसेवा रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर आणि प्रसाद राऊत हे देखील उपस्थित होते. स्वत: लसीकरण करुन घेतल्यानंतर श्री विवेक पंडित यांनी संघटनेच्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी उसगाव येथे खास लसीकरण शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी अशा ज्येष्ठ सदस्यांनी आपले आधारकार्ड संघटनेच्या कार्यालयात जमा करण्याबाबतचे आवाहन श्री पंडित यांनी केले.

कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचां पुरवठा व्हावा तसेच त्यांना खावटी योजनेचा लाभ मिळावा यासाठी विवेक पंडित यांनी शासन स्थरावर प्रयत्न केले, श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गरीब गरजूनना अन्नधान्य पुरवला, आंदोलनं केली तसेच न्यायालायाची लढाई देखील लढली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यावेळी संघटनेच्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतली, रोगप्रतिकार शक्ती वडवी यासाठी औषध – गोळ्या, स्टीमर चे वाटप केले. अशावेळी आज पंडित यांनी  कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही कोरोनाची लस मिळावी म्हणून विवेक पंडित सतत विचार करत असतात.

त्यामुळे “सतत आदिवासी दुर्बलांच्या समस्या सोडवण्याचा ध्यास विवेक पडित यांच्या मनात असतो, त्यामुळे सर्वसामान्यांशी नाळ असलेला नेता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री विवेक पंडित” अशी प्रतक्रिया श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.