Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बल्लारशाह रेल्वे स्थानकात मान्यताप्राप्त युनियनसाठी मतपत्रिकेद्वारे मतदान.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मान्यताप्राप्त युनियनसाठी रेल्वेच्या सात युनियन मैदानात उतरल्या आहेत, सदर 3 दिवस मतदान प्रक्रिया चालणार आहे . त्यामूळे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर युनियनच्या पोस्टरबाजीने वातावरण रंगतदार पाहायला मिळत आहे . मध्य रेल्वेसह देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये मतपत्रकेविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याने सध्या एकच विषय चर्चेचा पाहायला मिळत आहे.

चंद्रपूर : जिल्हातील बल्लारशाह रेल्वेची मान्यता मिळण्यासाठी युनियनच्या बाजूने ३५ टक्के मतदान आवश्यक असते. ही मान्यता मिळावी. यासाठी सात युनियन्स निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. यामुळे बल्लारशाह रेल्वे स्थानक निवडणुकीत उभे असलेल्या सात युनियन्सच्या पोस्टरबाजीने रंगून गेले आहे. सध्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन या मान्यताप्राप्त युनियन आहे. या निवडणुकीसाठी रेल्वे कर्मचारी ४,५ ला व ६ डिसेंबर रोजी रनिंग स्टाफसाठी मतदान घेण्यात येत असून विशेष म्हणजे हे मतदान मतपत्रिकरद्वारे होत असल्याने सर्वांचे लक्ष मतपत्रिके कडे लागलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मतदान प्रक्रिया सकाळी ८ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. मागील १० दिवसांपासून मतदारांना आकर्षित करण्यात युनियनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. ज्या युनियन्सच्या बाजूने किमान ३५ टक्के मतदान होईल, त्यांनाच रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत मान्यता देण्यात येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर, बल्लारशाह येथे मतदारांची संख्या १ हजार ७०० आहे. निवडणुकीत उभ्या असलेल्या युनियनमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन, मध्य रेल्वे कर्मचारी संघ, रेल मजदूर युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व रेल्वे कामगार सेना या ७ युनियन आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.