Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १७० ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • ७.३० ते ९.३० च्या दरम्यान मतदानाची टक्केवारी १८.५७%
  • अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त
  • प्रत्येक मतदारांची होत आहे आरोग्य तपासणी  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. १५ जानेवारी: कोरची हा संपूर्ण तालुका अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असतांना या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान सुरु झाले आहे. या तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर गडचिरोली मधील पहिल्या टप्यातील ६ तालुक्यातील १७० ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु असून ७.३० ते ९.३० च्या दरम्यान मतदानाची टक्केवारी १८.५७% इतकी होती. कोरची येथील तहसीलदार भंडारी यांनी  कोचीनारा येथील मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली व तालुक्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणूक केंद्रावर आरोग्य विभागाने आपली चमू उपस्थित ठेवून प्रत्येक मतदारांची तपासणी करीत होते. तापमान मोजणे आणि सॅनिटाइजर लावणे असे कामे करीत होते. या कामी आशा वर्कर आघाडीवर आहेत.

कोरची तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी 4 अविरोध तर 14 मध्ये निवडणूक शांततेत सुरु आहे. 4 ग्रामपंचायत अतिसंवेदनशील असल्याने त्या केंद्रावर केंद्र अधिकाऱ्यांना हेलीकॉप्टरने पाठविण्यात आले. बेस कँप कोटगुलला सर्वांना ठेवण्यात आले होते.

या तालुक्यातील 29 ग्रामपंचायत पैकी 18 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार होती. पण त्यापैकी 4 ग्रामपंचायत अविरोध आल्या. त्यात टेमली, कोसमी-2, मर्केकसा आणि आस्वलहुडकी या ग्रामपंचायत अविरोध आल्या.

बेळगाव, बेतकाठी, बिहीटेकला, बोरी, कोचीनारा, कोहका, मसेली, नवरगाव, अल्लीटोला, कोटगुल, अरमुरकसा, सोनपूर, व नांगपूर अशा एकूण 14 ग्रामपंचायत मध्ये मतदान आज पार पडत आहेत.

कोरची तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४० प्रभाग आहेत एकूण ९१ जागासाठी १९४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण संवेदनशील मतदान केंद्र ४० आहेत. अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार नारनवरे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.