Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्ध्यात फोडले एटीएम, 22 लाखाची रोकड लंपास

दोन ठिकाणी एटीएम वर दरोडा, गॅस कटर आणि सिलेंडर हे सोडून चोरटे पसार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा  29 ऑगस्ट :-  वर्ध्याच्या वायगाव आणि बोरगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एटीमवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानी 22 लाखाची रोकड लंपास केली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने हे एटीएम फोडण्यात आले आहे.

हिंगणघाट मार्गावर असलेल्या वायगाव आणि बोरगाव या दोन्ही ठिकाणी चोरट्यानी एटीएम फोडले आहे. पाहटे तीन वाजता हे एटीएम फोडण्यात आले. एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही वर काळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आलाय. त्यांनतर चोरट्यानी चोरी किली आहे. तब्बल 22 लाखाची रोकड एटीएम फोडून लंपास करण्यात आली आहे. बोरगाव येथे एटीएम ला गॅस कटर लावले गेले पण त्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे ते वायगावला पोहचले. वायगाव येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम तोडण्यात आले. चोरट्यानी 22 लाखाची रोकड काढलीय. मोठ्या गाडीने आलेल्या चोरट्यानी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी आल्यावर पळ काढलाय. पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटे पसार झाले आहेय. गॅस कटर आणि सिलेंडर हे सोडून चोरटे पसार झाले आहे. सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली असून चोरटे वर्ध्याच्या आसपासच दडून बसले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पहाटे दरोडा घालणाऱ्या चोरट्यांचे आता पोलिसांसमोर खुले आव्हान असल्याचेच बोलले जात आहेय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धावत्या 108 रुग्णवाहिकेचं चाक निखळले…BVG चा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेततोय..

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.