आमदारांना खरचं ‘५० खोके’ दिले का ? हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे.. आमदार बच्चू कडू यांचा संतप्त सवाल
रवी राणा..आरोप सिद्ध करा...नायतर माफी मागा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 27 ऑक्टोबर :- एकनाथ शिदे यांना समर्थन देणाऱ्या ५० आमदारांना खरचं ‘५० खोके’ दिले का? हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कारण कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत. सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आम्ही त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडू यांनी केला आहे.
						
			
											

Comments are closed.