Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्वीत उपाध्यक्षपदाची लॉटरी कोणाला?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आर्वी, 9 जानेवारी:  स्थानिक नगरपालिकातील भारती निलेश देशमुख यांनी 6 जानेवारी रोजी उपाध्यक्षपदाचा राजिनामा देल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नवीन उपाध्यक्ष कोण याकडे आर्वीकरांची नजर लागली आहे. आर्वी नगर पंचायतवर भाजपाची एकहाती सत्ता आहे, हे उल्लेखनिय!

आर्वी नप उपाध्यक्षपदाच्या निवडीकरिता विशेष सभा नगर परिषद कार्यालयातील सभागृहात 14 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात येणार आहे. उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यात इच्छुक असलेल्या नगरपरिषद सदस्यांना नामनिर्देशन पत्रं 14 रोजी सकाळी 11 वाजतापासुन दुपारी 1 वाजेपर्यंत मुख्याधिकार्‍यांकडे दाखल करावे लागतील. 23 पैकी 23 नगरसेवक भाजपाचेच निवडून आल्याने आ. दादाराव केचे ज्याचे नाव सुचवेल तोच नवीन उपाध्यक्ष होईल, अशी जोरदार चर्चा आहे. या शर्यतीत प्रतिभा विजय गिरी यांचे नाव आघाडीवर आहे. गिरी यांना आतापर्यंत कोणतेही लाभाचे पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.