Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीमराव आत्राम यांना पत्नीशोक

आलापल्ली येथील माजी मुख्याध्यापक तथा शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मृती समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम यांना पत्नीशोक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ४ मे: आलापल्ली येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मृती समितीचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक भीमराव आत्राम यांच्या पत्नी चंदा भीमराव आत्राम (६७) यांचे काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी आलापल्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.