Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 04 मे:– देशातील कोरोनाचं संकट दिवसे न् दिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. केंद्र सरकार परिस्थिती समजून घेत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच त्यावर पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊन करण्यास विरोध केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गरीबांना सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. लॉकडाऊनमुळे व्हायरसला हरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. लसीकरण आणि कोरोना रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून राहुल यांनी केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. लसीकरण अत्यंत धीम्यागतीने होत असल्याबद्दलही त्यांनी सोमवारी केंद्रावर टीका केली होती.

Comments are closed.