गडचिरोली अतिदुर्गम भागातील महिला शेतकरी कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहलीकरीता रवाना
‘पोलीस दादालोरा खिडकी’ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 1 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्राबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाया शेतकयांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील महिला शेतकयांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे पेंढरी, कारवाफा, कटेझरी, ग्यारापत्ती, मुरुमगाव, कटेझरी, कोटगुल, कोरची, रेगडी, पुराडा पोमकें चातगाव, सावरगाव, गोडलवाही, गट्टा (फु.), बेडगाव, मालेवाडा व पोटेगाव हद्दीतील एकुण 50 महिला शेतकयांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकुण दहाव्या कृषीदर्शन सहलीचे व सन – 2023 मधील सहाव्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यापुर्वी झालेल्या एकुण नऊ कृषी दर्शन सहल व अभ्यास दौयांमध्ये दुर्गम भागातील विविध उपविभागातून एकुण 410 महिला व पुरुष शेतकयांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या दहाव्या सहलीमध्ये कुरखेडा, धानोरा, पेंढरी, गडचिरोली उपविभागातील अतिदुर्गम भागातील 50 महिला शेतकयांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सहली दरम्यान सहभागी शेतकरी हे नागपुर, घातखेड, बडनेरा, अकोला, शेगाव, वरोरा येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्रातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.
सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनात आज दि. 01नोव्हेंबर पासुन दि. 06 नोव्हेंबर रोजी पर्यंत एकुण 06 दिवस आयोजीत करण्यात आला असून, या दहाव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल वअपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी हे उपस्थित होते.
Comments are closed.