Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देलनवाडी येथील विक्रेत्यांचे दारूअड्डे उध्वस्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 नोव्हेंबर : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे गाव संघटना, तंटामुक्त समिती, वनविभाग, पोलिस विभाग यांनी संयुक्त कृती करीत लाखोंचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कृती केली.

देलनवाडी परिसरातील दारू विक्रेते जंगलपरिसराचा आधार घेत हातभट्टी लावून दारू गाळतात व विक्री करतात. यामुळे परिसरात दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे . अवैध दारूविक्री विरोधात गाव संघटनेने लढा देण्याचा निर्णय केला. त्यानुसार गावातील विक्रेत्यांना अवैध दारूविक्री बंद करण्याची  सूचना गाव संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली. तरीसुद्धा मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच जंगलपरिसरात विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी हातभट्टी लावली असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिस, तंटामुक्त समिती, वनविभाग व गाव संघटनेने संयुक्त मोहीम राबवित जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली असता, २० ते २५ ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दिलीप मुनघाटे, हवालदार राजू उराडे व वनविभागाचे क्षेत्रसहायक एस. व्ही. नारनवरे वनरक्षक आर. पी. नन्नावरे, वनरक्षक व्ही. व्ही. राऊत यांनी केली. यावेळी गावसंघटनेचे अध्यक्ष हरबाजी घोडमारे, तंमुस अध्यक्ष विजय मोहुर्ले, उपसरपंच गावतुरे, पोलिस पाटील कोमल धुर्वे, अरुण कुमरे, वामन भांडारकर, रमेश मडावी, श्रावण धुर्वे, मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, स्वीटी आकरे, दीक्षा तेलकापल्लीवार यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.