Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

थायलंडच्या सहलीतून बुद्ध धम्माचा अभ्यास

आलापल्लीतील 55 जणांचा सहभाग...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी दि,५ नोव्हे: तृष्णेचा त्याग, लोभ व हावाला काबूत ठेवणे, सर्व संस्कार अशाश्वत आहेत, सर्व वस्तूंची उत्पत्ती हेतू आणि प्रयत्न यामुळे होते, सजीव प्राण्यांचे जिवंत शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज व वायू या चार महाभूतांचा परिणाम अशा सर्व नैतिक बाबींचा अभ्यास बुद्ध धम्माच्या मुळाशी असल्याने त्यांचा प्रत्यय आलापल्लीतील ५५ नागरिकांनी थायलंड मधील सहलीच्या माध्यमातून विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन नुकताच अनुभवल्याची माहिती सहअभ्यासक असलेल्या सुशीला भगत यांनी दिली.

भदंत तीसबोधी आयोजित अविस्मरणीय महाबोधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अमरावतीने आंतरराष्ट्रीय बुद्ध पर्यटन व अभ्यास सहल ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली होती .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

थायलंडच्या बँकॉक मधील वट वरून व नाम, रॉयल पॅलेस, गोल्डन टेम्पल तर आयुथ्थया मधील सनफेट, वट फ्रॉम मांग, ब्रोन बोफीट तसेच धम्मकायात धम्माच्या प्रसारातील टेम्पल व सुप्रीम हॉलमध्ये गाईड गौतमच्या माध्यमातून अभ्यास व पर्यटन करण्याची संधी मिळाली.
तसेच पटाया मधील सेंचुरी ऑफ टूथ, बींग माउंटन बुद्धा व कोरट मधील वट नाम कुम स्थळी नागपूर ते कोलकत्ता रेल्वे व कोलकत्ता ते बँकॉक पर्यंत विमानाने गेलेल्या अलापलीच्या ५५ नागरिकांना अभ्यासाचा लाभ मिळाला.साता समुद्रापार पर्यटनातून अभ्यासाच्या संधी मिळालेल्या सोबत भंते सुशीम, भंते धम्मदास, दादाजी फुलझेले, गौरव भगत उपस्थित होते.

थायलंड येथील बुद्धाच्या अनुयायीनी अंगिकारली संस्कृती, संस्कार, आत्मियता त्यांनी तेथेच साजरा केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून अनुभवाला मिळाल्याची माहिती सुशीला भगत आणि गेलेल्या सर्व उपासकानी माहिती दिली.
थायलंडमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवलेल्या व अभ्यास केलेल्या बुद्धाच्या विचारांची फळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात असलेल्या आदिवासी व दुर्गम भागातील उपासक व उपासिकांना रुजविण्याचा प्रयत्न करायचा मानस सुद्धा यावेळी अभ्यास केलेल्या ५५ नागरिकांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.