Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी न्यायालय कडून जागतिक जेष्ठ नागरीक दिन साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 3 ऑक्टोंबर : स्थानिक दिवानी व फौजदार न्यायालया तर्फे जागतिक जेष्ठ नागरीक दिन कार्यक्रम प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदार न्यायाधिश एस.एम.एच.शाहिद तथा कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

प्रमूख अतिथी ॲड सतीश जैनवार अधिव्यख्यता व सचिव अहेरी न्यायालय , विनोद भोसले, राष्ट्रपती पूरस्कृत प्राप्त आदर्श शिक्षक व सत्यनारायण सिलमवार, सेवानिवृत ना.तहसिलदार हे होते.
न्यायाधीश शाहिद यांनी प्रत्येक व्यक्ती हा वृध्द होत असतो. आपण आपल्या मूलाबाळाचे संगोपन हे केले तर होणार नाही. त्यांना चांगले सवयी सुस्ंकृत करणे व त्यांना वेळ देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे . कारण प्रत्येक व्यक्तीवर ही पाळी येणार म्हणून जर आपण वेळेतच लक्ष देवून सावरणे ही काळाची गरज आहे. जेणे करूण एकाद्या वृदाश्राम मध्ये जाण्याची पाळी येणार नाही . असे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जैनवार यांनी जेष्ठ नागरीकां करीता सन २००७ मध्ये कायदा मध्ये सूधारणा केले , ज्या प्रमाणे वडीलांच्या प्रापर्टी वर मूंलाचे अधिकार असते . त्या प्रमाणे मूलाच्या प्रापर्टी वर सूद्धा आई, वडीलांच अधिकार असते. असे अत्यंत महत्वाचे कायदे विषयी मार्गदर्शन केले. प्रमूख अतिथी भोसले सर यांनी जेष्ठ नागरीक कल्याण मंडळ ची स्थापना करूण स्वता: च्या मालकीचे जमिन करूण विरंगूळा केंद्र व बगीच्या करण्याचे मानस आहे असे म्हटले.

प्रास्तविकेतून अशोक निकूरे ( सचिव) यांनी जेष्ठनागरीक मंडळ ची स्थापना व कार्यपद्धती वर प्रकाश टाकताना ५८२ सदस्य अहेरी मंडळ मध्ये कार्यरत असून देशात १० करोड जेष्ठ नागरीक असून कित्येक पालक आपल्या पाल्या पासून दूर राहत असून दयनिय परस्थिती जिवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या वर आढा आणने आपले कर्तव्य आहे. कार्यक्रमचे संचलन मधूकर ( बबलू) सडमेक यांनी केले आभार प्रकाश मारपकवार कनिष्ठ लिफीक दिवानी फौजदार न्यायालय यांनी माणले. कार्यक्रमाचे यशस्वी करीता श्रीमती सूषमा पाचभाई वरिष्ठ लिफीक अशोक पूसलवार, नानाजी जक्कोजवार, दोंतूलवार सर , चंन्द्रशेखर गूरूनूले, रमेश सडमेक, व इतर सर्व कोर्ट अमलदार व कर्मचारींनी मदत केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.