Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दि. २२ एप्रिल: नाशिक महानगरपालिका झाकीर हुसेन रुग्णालयात काल झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम झालेल्या व उपचार घेणाऱ्या रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे १२ पुरुष व १० महिला रुग्णाचा मृत्यू झाला सदर प्रकार कोणाच्या तरी हलगर्जीपणा मुळे झाल्याचा संशय असून सदर २२ रुग्णांचा मृत्यू ला कारणीभूत झाल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून  तपास  सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. या घटनेची आता शासकीय पातळीवर  महसूल आयुक्त यांच्या चौकशी समिती मार्फत व पोलिसांच्या मार्फत अशा दोन्ही पातळीवर चौकशी आणि तपास होणार आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.