Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांवर आक्षेपाहार्य व्हीडिओ बनवणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक

पिंपरी चिंचवड येथील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 9 एप्रिल :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ आणि फोटो मॉर्फ त्यांची करून देशभरात बदनामी करणाऱ्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सायबर विभागाने अटक केली आहे. शमीम जावेद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांचं नावं असून त्याला झारखंड राज्यातील रांची मधून अटक करण्यात आलीय.

राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी यासंदर्भामध्ये सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली होती, त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस या तरुणापर्यंत पोहोचले मात्र आरोपीने तक्रार करणाऱ्या माजी खासदार अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंटही हॅक केले अशी माहिती साबळे यांनी दिलीय. तर संबधित तरुणाला आज पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर कोर्टाने त्याची रवानगी जेल मध्ये केलीय हा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीने देशातील अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हिडिओ मोर्फ केले असल्याची बाब तपासात उघडकीस आल्याचं सांगत जर अशा पद्धतीने कुणी फोटो व्हिडिओ मॉर्फ करत असेल तर त्यांच्या विरोधातही सायबर ॲक्ट नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख संजय तुंगार यांनी दिलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.