Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेयसीच्या मृतदेहाचे केले 35 तुकडे

दररोज रात्री एक एक तुकडा टाकत होता बाहेर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

दिल्ली, 14 नोव्हेंबर :-  दिल्लीत 5 महिन्यापूर्वी 26 वर्षीय लिव-इन-पार्टनर श्रध्दा वाकरचा गळा आवळून खुन आणि नंतर मृतदेह गायब करणार्या आरोपी आफताब अमीन पुनावालाला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी आरोपी आफताब वर खुनाचा अपराध दाखल केला असून श्रध्दाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. आफताब याने श्रध्दाचा खुन करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. 8 नोव्हेंबर ला 59 वर्षीय विकास मदान वाकर यांनी आपल्या मुलीच्या अपहरणाची एफआईआर दिल्ली येथील महरौली ठाण्यात दिली होती.

26 वर्षीय श्रध्दा वाकर मुंबईच्या एका मल्टीनॅशनल कंपनीच्या काॅल सेंटरवर काम करत होती. याच दरम्यान श्रध्दाची आफताब अमीन सोबत ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना पसंद करू लागले आणि लिव-इन-रिेलेशन मध्ये राहु लागले. ज्यावेळी याची माहिती कुटूंबियांना मिळाली तेव्हा या लिव-इन-रिलेशन ला त्यांच्याकडून विरोध होउ लागला. याच्यामुळे श्रध्दा आणि आफताब नी अचानक मुंबई सोडले आणि महरोली के छतरपूर क्षेत्रात ते राहु लागले. यादरम्यान श्रध्दाचा फोन नंबर बंद राहु लागला. श्रध्दा वाकरच्या वडीलांनी सांगितले की, ते आपल्या कुटूंबासोबत महाराष्ट्रच्या पालघर इथे राहतात. जेव्हा ते 8 नोव्हेंबरला छतरपूर येथील श्रध्दाच्या फ्लॅटवर गेले असता त्यांना तेथे कुलूप दिसले. यावेळी त्यांनी महरोली ठाण्यात जाउन एफआईआर दाखल केली. पोलीसांनी शनिवारी आफताबला अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, आफताब ने सांगितले कि लग्नावरून नेहमीच श्रध्दा त्यांच्यावर दबाव आणत होती. यामुळे नेहमीच दोघांमध्ये भांडण व्हायची. अशातच भांडणात आफताबने श्रध्दाचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेंकल्याचे कबूल केले. 18 दिवस मृतदेहाचे तुकडे अलग अलग जागी जाउन फेंकत होता. त्याने मृतदेह ठेवण्यासाठी एक मोठा फ्रिज पण घेतला होता.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.