Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक; उत्तर प्रदेशमध्ये एटीएसची मोठी कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

लखनऊ : उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊमधील काकोरी भागात अतिरेकी असल्याची माहिती एटीएसला मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)  अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे.

परिसरात बाँम्ब स्कॉडदेखील दाखल झालं होतं. एटीएसला एका घरात कुकर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. एटीएसकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एटीएसनं हा परिसर सील केला असून त्या परिसरात कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील कुटुबांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएसकडून अधिक चौकशी सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटीएसनं या भागातून काही स्फोटक पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे. एटीएसनं या ठिकाणाहून दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यापैकी एक जण हा जुम्मूमधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे.

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकानं अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. या दोन्ही अतिरेक्यांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून सूचना मिळत होत्या अशी माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही अतिरेक्यांची चौकशी सुरु असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. एटीएस दोघांशिवाय आणखी अतिरेकी त्या भागात लपले आहेत का? याचा शोध घेत आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी या मार्गावरुन जाणारी वाहतूक देखील थांबवली आहे. सर्च ऑपरेशन सुरु असेपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहील, असं देखील कळवण्यात आलं आहे. लखनऊमध्ये काकोरी हा दाट लोकसंख्येचा भाग आहे. ही घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीनं सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल. या संदर्भात त्यावेळी अधिक माहिती दिली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

हे देखील वाचा :

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

BSNL ने लॉन्च केले 3 स्वस्त आणि मस्त प्रीपेड प्लान्स…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.