Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

वनकर्मचाऱ्यांचे एलआयसी, पतसंस्थेतील भरावयाच्या रक्कमेसह इतर शासकीय व्यवहारातही अनियमितता, भ्रष्टाचार केल्याचे वनाधिकाऱ्याच्या तपासात निष्पन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर

भाग १ 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आशिष पांडे उपवनसंरक्षक भामरागड वनविभागात हे अतंत्य कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून वन विभागातील केलेल्या कर्मचाऱ्यांच्या चुका एक-दोनदा समज देऊनही ऐकत नसलेल्या कर्मचाऱ्यांना लेखी उत्तर मागत असतात. याच अधिकाऱ्याचे दुसरे रूपही वन कर्मचाऱ्याने बघितले आहे. त्यांना कामाप्रती आदर आपुलकी असल्याने  कर्तव्यात कसूर, कामात अनियमितता, भ्रष्टाचार या गोष्टीला थारा घालत नाही. मात्र वनविभागातील कोणत्याची कर्मचाऱ्यास आपत्ती निर्माण झाल्यास त्यांना वेळीच शासकीय मदत करतात. एवडेच नव्हे तर वेळप्रसंगी आपल्या परिवारातील सदस्य समजून स्वताच्या जवळील पैसे देऊन गरज भागवितात. कुठल्याही वनाची तक्रार मिळाल्यास ते स्वतः नक्षलग्रस्त भागात जाऊन कारवाई करतात. गोरगरीब आदिवासी बांधवांनाही सहकार्य करतात त्यामुळे सर्वांना परिचित झाले आहे.

गडचिरोली : एटापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एच. राठोड २२ जानेवारी २०१८ रोजी कर्तव्यावर नव्याने रुजू झाल्यापासून दबंगगिरीमुळे चांगलेच चर्चेत आले असून वादग्रस्तही तितकेच ठरले आहे. हे आरोप करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून एटापल्ली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीच राठोड यांच्या विरोधात मनमानी कारभाराच्या जाचाला कंटाळून दि. १२ जून २०२१ रोजी उप वनसंरक्षक भामरागड वन विभाग यांना कर्मचाऱ्यानी आर्थिक व्यवहारात भ्रष्टाचार, अनियमितता असल्याचे दस्ताऐवजासह लेखी तक्रार देण्यात आली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आशिष पांडे, उपवनसंरक्षक (प्रादे.) वन विभाग भामरागड हे प्रत्यक्षात एटापल्ली वनपरिक्षेत्रात दौरा करून तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी तक्रार देणाऱ्या कर्मचाऱ्याना बोलावून चौकशी केली असता शासकीय विविध कामात अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले असून त्याचा अहवालही वरिष्ठ वनाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून निलंबनाच्या कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून कारवाई कधी होणार याकडे संपूर्ण वनकर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे ती अनियमितता, भ्रष्टाचारचे प्रकरण 

  • वनपरिक्षेत्र एटापल्लीतील वनरक्षक, वनपाल यांचे एलआयसी व इतर बाबत तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीची रक्कम व पतसंस्थाकडे पाठविण्यात येणाऱ्या रक्कमामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून अधिकचे पैसे कपात करण्यात आलेले आहे.
  • रात्री अपरात्री काही वनरक्षकांना सोबत घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती वरून जाऊन बांडे नदीवर अवैधरेती ट्रक्टर पकडून सोडण्यासाठी स्वतः रक्कम वसूल करतात व वसुली करून रक्कमासह वापस आणण्यास तोंडी आदेश देतात यामुळे तेजावत सारखे वनरक्षक ACB च्या जाळ्यात अडकले आहे.
  • कटिया लेखामी, हेडरी या गावातील इसमाकडून सागच्या पाट्या व बाटम जप्त करण्यात आले असले तरी वनगुन्ह्याची नोंद न करता वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वत:च्या रेस्टहाऊस मध्ये ठेवेले होते हे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
  • वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांनी साग लट्टे चामोर्शी येथे आयशर वाहनाने वाहतूक करून चिरान करण्यासाठी नेण्यास वनरक्षक बालाजी पाटील यांना बळजबरीने वाहनात बसवून टीपी नसतांना नेत होते. सदर प्रकरण वन विभाग मुलचेरा यांना माहिती होताच नाक्यावर वन पथक पाठविण्यात आले होते.  त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुगावा लागल्याने राठोड यांनी सदर लट्टे जंगलात ठेवले. व काही दिवसात जाळावयास लावले याची अंदाजित ४ लाख रुपये ही शासकीय किंमत असून प्रत्यक्षात त्याची संपूर्ण माहिती तपासात निष्पन्न झालेली आहे.
  • सयुंक्त वनव्यवस्थापन समिती (JFM) जीवनगट्टा यांच्यासाठी आणलेली टीव्ही राठोड त्यांना न देता आपल्या स्वताच्या घरी त्याचा वापर करीत असून पुन्हा असे अनेक मुद्दे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली एस. एच. राठोड यांचा परीविक्षाधिन कालावधी याच वनपरिक्षेत्रात असून रुजू झाल्यापासूनच कर्तव्यावर अधिनिस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारीपणाचा आव आणून शिवगाळ, अपशब्द, नाहक त्रास देऊन कंटाळून सोडले होते. मात्र याची दखल वरिष्ठांनी वेळीच घेतली नसल्यामुळे या अधिकाऱ्याची मुजोरी वाढली होती.

 

आ7अनेकदा कर्मचाऱ्यां मार्फत समज देण्याचा प्रयत्न झाला होता. माजी वनमंत्री संजय राठोड हे नातलग असल्याचे भासवून शिवाय वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत: असल्याने तक्रार देण्यास कुणीही कर्मचारी समोर धजावत नसल्याने त्यांची मनोपल्ली दिवसंदिवस वाढतच गेल्याने मनात जसे येईल तसे करणे सुरु केले. त्यामुळे “कुंपणच शेत खाते” तेव्हा ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू होते.

परीविक्षाधिन काळात शासनाचे दिलेले ध्येयधोरण, प्रामाणिकता प्रशासनाचे कर्तव्यनिष्ठा दिलेली प्रशिक्षण काळातील शपथ या सर्व गोष्टीलाच हळताळ फासल्याच पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी व ईतर संयुक्त वनव्यवस्थापने दिलेल्या तक्रारीमुळे समोर आले आहे. त्यामुळे परीविक्षाधिन कालावधीतच अशी दबंगगिरी असेल तर बाकी विचार न केलेलाच बरा! याकडेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे गरज आहे.

एस. एच. राठोड यांनी वनातील अवैध वृक्षतोड, उत्खनन, रस्ते पूल विनापरवानगीने आजही सुरु आहे. या शिवाय अवैध उपसा करणाऱ्या मुरूम, गिट्टी, दगड, रेती, विटा भट्टी प्रकरणात जीवनगट्टा या गावातील ४० ते ५० नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना  राठोड विरोधात लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशी सुरु असून या प्रकरणातही गैरव्यवहार झाल्याचे जीवनगट्टा गावातील नागरिकांनी आरोप केले आहे.

प्रशासकीय कामातही व्यक्तिगत लाभ जिथे होईल त्याच ठिकाणी राठोड अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे अनेकदा आरोपही झाले आहे. आता तक्रारीअंती आरोपही सिद्ध झाल्याने वरिष्ठ अधिकारी कधी निलंबन करणार याकडे सर्व स्थानिक जनतेचे वनव्यवस्थापन समितीचे, वन विभागाच्या वन कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या तक्रारीनुसार सर्व बाबींची पडताळणी करून प्राथमिक चौकशी केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एच. राठोड, लिपिक डी. वाय. चव्हाण हे स्वत जबाबदार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  तेव्हा तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

आशिष पांडे – उपवनसंरक्षक, भामरागड वन विभाग स्थित आलापल्ली

हे देखील वाचा  :

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; तीन आरोपींचा जामिन अर्ज कोर्टाने नाकारला

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

 

Comments are closed.