Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी

शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी यांत्रिकीकरणाला स्विकारण्याचे केले आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.10 जुलै : जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्यालीत दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरूवात केली आहे.

साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल असे ते यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने आता धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले व शेतकरी यांनी यांत्रिकीकरण करून आधुनिक शेतीचा स्विकार करावा असे आवाहनही केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कृषी विभागाने नियोजन व मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येत्या काळात जिल्हयातील रब्बी मधील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात ४० मशीन घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन १०० एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.

हे देखील वाचा :

चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले तब्बल १९५ ध्वज

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

दक्षिण आर्मी कमांडर यांनी प्रादेशिक सेना गृप मुख्यालय आणि अग्नीबाझ विभागाला भेट देवून कार्य सज्जतेचा घेतला आढावा

Comments are closed.