Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे, दि. ९ जुलै : रस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेंसर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स ने वरीष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जिणं मुश्किल झाले असून त्यामुळे अनेक व्याधी जडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे.

दिनांक १५ जून २०२१ पासून सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास एक हजार पेक्षा जास्त सायलेंसर आणि जवळपास ४०० प्रेशर हॉर्न्स बुलडोजर खाली चिरडण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. कानाचे पडदे फाटतील एवढे कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स आणि छातीत धडकी भरवणारे सायलेंसर विशेषतः एनफिल्ड बुलेट या गाडीत लावले जातात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याच्या आवाजाने अनेक वरीष्ठ नागरिक आणि लहान बाळांना निद्रानाश, चिडचिड होणे आणि हायपरटेन्शन सारख्या गंभीर व्याधी जडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तक्रारींची सत्यता पडताळून सदर कारवाईला सुरुवात केल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

सर्व दुचाकी चालकांनी असे हॉर्न आणि मॉडिफाईड सायलेंसर लावले असल्यास त्यांनी ते त्वरित काढावेत अन्यथा वाहचालकसोबतच हे सायलेंसर आणि हॉर्न्स विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ

 

 

Comments are closed.