Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी हे देखिल कारणीभूत आहेत, अशा आशयाचे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादरर केले आहे.

या प्रकरणात एफआयआर रद्द करावा, अशा आशयाची विनंती याचिका रेड्डी यांनी खंडपीठात दाखल केली आहे. त्याला उत्तर देताना उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाने शपथपत्र सादर केले. शिवकुमार हा अधिकारांचा दुरुपयोग करून चव्हाण यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. चव्हाण यांचा सर्वांसमोर अपमान करीत होता. त्यामुळे, दीपाली चव्हाण यांना नैराश्य आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यांनी शिवकुमारच्या बेकायदा वागणुकीविषयी रेड्डींकडे वारंवार तक्रारी करीत कारवाईची मागणी केली होती. २५ जानेवारी २०२१ रोजी चव्हाण व त्यांच्या पतीने रेड्डी यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. मात्र, रेड्डी यांनी शिवकुमारवर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे, शिवकुमारचा त्रास कायम राहिला. रेड्डी यांनी त्याला पाठीशी घातल्याने चव्हाण यांच्यावरील मानसिक दबाव वाढला, अशा आशयाचा सरकारने शपथपत्रात उल्लेख केला आहे.

शिवकुमारवर कारवाई होण्याची काहीच शक्यता दिसून न आल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. सुनावणी दरम्यान युक्तीवादात सरकारने रेड्डी यांचा बचावही खोडून काढला. शिवकुमार विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा रेड्डी यांनी केलेला दावा चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे सरकारने म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रकरणाच्या तपासादरम्यान रेड्डी यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आढळून आले. त्यामुळे, त्यांना अटक करण्यात आली. अटक बेकायदा असल्याचा रेड्डी यांचा आरोप निरर्थक आहे. रेड्डी यांना शिवकुमारच्या अवैध वागणुकीची पूर्ण कल्पना होती. असे असतानाही ते गप्प राहीले, असेही स्पष्टीकरण शासनाने दिले.

रेड्डीचा निलंबन कालावधी वाढवला

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. दीपाली चव्हाण यांनी २६ मार्चला राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी श्रीनिवास रेड्डीच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर छळ केल्याचा ठपका ठेवला होता.

राज्यसरकारने ३० मार्चला रात्री उशिरा रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. त्याचवेळी रेड्डी यांच्या भूमिकेविषयी चौकशी करण्यासाठी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सरवदे यांनी त्यांचा अहवाल मंत्रालयातील वनखात्याकडे सोपविल्यानंतर या अहवालाच्या आधारे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला सुमारे १२-१३ दिवसांपूर्वी आरोपपत्राबाबत ई-मेल आला. दरम्यान, राज्य सरकारने येत्या सप्टेंबरपर्यंत त्यांच्या निलंबन कालावधीत वाढ केली आहे, असे वनखात्याचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले.

संबंधित बातमी :

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन

शिवकुमारचा जामिनासाठी अर्ज

हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर एक आठवड्यात उत्तर सादर करा, असे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले. शिवकुमारने अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २० जून रोजी फेटाळण्यात आला. त्यामुळे शिवकुमारने तो दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शिवकुमारतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

हे देखील वाचा  :

राज्यात ६१०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास मिळाला हिरवा कंदिल!, पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या माध्यमातून होणार प्रक्रिया

गडचिरोली जिल्ह्यात आज 19 कोरोनामुक्त तर 34 नवीन कोरोना बाधितांची नोंद

 

Comments are closed.