Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग: नक्षल्यांनी PMGSY च्या कामावरील १५ ते २० वाहनांना केले आगीच्या स्वाहा

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • कामावरील १५ ते २० मजुरांना बंधक ठेवल्याची माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

छत्तीसगड, दि. २५ मार्च: केशकालच्या कुएंमारी भागात नक्षलवाद्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामावर असलेल्या १० ते १५ वाहनाची जाळपोळ केली आहे.  जाळपोळ केलेल्या वाहनामध्ये जेसीबी, ६ हाइवा, ७ ट्रॅक्टर, २ पोकलेन, १ वाईब्रो, १ शिफ्टर यांचा समावेश आहे. नक्षलवादी सतत या भागात विकासकामांना विरोध करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 घटनेच्यावेळी सुमारे २० नक्षलवादी सोबत १ महिला नक्षलवादीचा समावेश होता. ते साध्या वेशात आले होते. अशी माहिती कामावर असलेल्या सुपरवायझरने दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनास्थळी कार्यरत सुपरवायझरने सांगितले की प्रथम नक्षलवाद्यांनी डोक्यावर बंदूक घेऊन प्रत्येकाचे नाव विचारले. घटनास्थळी १५ ते २० मजूर कामावर होते. त्यापैकी ४ ते ५ मजूर नक्षल्यांचा तावडीतून पडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यानंतर, कंत्राटदार कोठे आहे हे विचारून, हे काम बंद करा अन्यथा  कंत्राटदाराला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बस्तरचे आयपीजी सुंदरराज यांनी घटनास्थळी दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलीसबल रवाना झाले आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.