Budget 2021: अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झालं?
सामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी: – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनीही अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या की, देशाचा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे, जेव्हा देशाचा जीडीपी दोन वेळा मायनसमध्ये गेला आहे. आर्थिक मंदीचा विचारही केला नव्हता, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
काय महाग झालं?
- मोबाईल फोन आणि मोबाइल फोनचे भाग, चार्जर्स.
- गाड्याचे स्पेअर पार्ट्स
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे
- इम्पोर्टेड कपडे
- सोलार इन्व्हर्टर, सौर उपकरणे
- कापूस
- रत्न महागणार
- लेदलच्या गोष्टी महागणार
- तांब्याच्या गोष्टी महागणार
काय स्वस्त झालं?
- सोनं-चांदी स्वस्त होणार
- वीज स्वस्त होणार
- लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार
- रंग स्वस्त होणार
- स्टीलची भांडी स्वस्त होणार
- इंश्युरन्स स्वस्त होणार
- ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार
- चप्पल स्वस्त होणार
- नायलॉन स्वस्त होणार
- चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार
Comments are closed.