Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनामुळे 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षावरचे तर 50 टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

 अनेकजण कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाहीत असं केंद्र सरकारच्या अहवालात मांडण्यात आलंय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 28 मार्च :– देशात आतापर्यंत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले आहेत त्यापैकी 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. तसेच देशातल्या 90 टक्के लोकांना मास्क घालण्याचे महत्व माहीत असूनही केवळ 44 टक्केच लोक मास्कचा नियमित वापर करतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्व्हेमध्ये सांगितलंय. गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे या नियमांचे काटेकोरपणे पालन नागरिकांकडून केलं जात नाही असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशातल्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या 12 राज्यांतील अधिकारी आणि 46 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या सर्व गोष्टींवर चिंता व्यक्त करण्यात आली. या 12 राज्यांत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू काश्मिर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.

देशातील केवळ 46 जिल्ह्यांत 71 टक्के कोरोनाचे रुग्ण आढळतात आणि 69 टक्के मृत्यूही याच 46 जिल्ह्यांत झाल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसात देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडल्याचं पहायला मिळतंय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण पहायला मिळाले. महाराष्ट्रात 36,902 तर पंजाबमध्ये 3,122 आणि छत्तीसगडमध्ये 2,665 रुग्ण पहायला मिळालंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.