Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणी केंद्र सरकारच्या कायद्या विरोधात पाठींबा देण्यासाठी अमरावती, वाशिम येथे वंचितचे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती / वाशिम १७ डिसेंबर :- केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करुण आंदोलन कर्त्यांनी जिओच्या सिम कार्डची होळी करत केंद्र सरकार व अदानी अंबानी या उद्योगपती विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला..कृषी विधेयक हे उद्योगपती यांच्या हिताचे आहे त्यामुळे अदानी अंबानी यांच्या कंपनीला देखील विरोध अमरावती जिल्ह्यातुन होत आहे ,त्यामुळे केंद्र सरकारने लुटण्यासाठी हा कायदा केल्याचा आरोप यावेळी वंचित आघाडीने केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर वाशिम जिल्हात केंद्र सरकारने नव्याने पास केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तसेच मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाचा घातलेला घाट याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले असून,केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध करण्यात आला…

Comments are closed.