Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुशांत सिंह मृत्यूप्रकरनात एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ९ डिसेंबर: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणा संदर्भात NCB कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील एनसीबीनं मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार असल्याची माहिती एएनआयनी दिली आहे. तर महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे.

दरम्यान, एनसीबीकडून असेही सांगण्यात आले की, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करायचा. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत होता. बुधवारी NCB कडून करण्यात आलेली कारवाई ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे सकाळी कारवाई करण्यात आली. यादरम्यान, महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.