Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा

जाणून घ्या केव्हा आणि कसे घेऊ शकता याचा लाभ!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या स्वताच्या ग्राहकाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) शिवाय जीवन विमाचा आणखी एक मोठा फायदा मिळतो. ईपीएफचे सर्व ग्राहक (नोकरदार) इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, १९७६ (ईडीएलआय) अंतर्गत प्राप्त होतात. ईडीएलआय स्कीम अंतर्गत प्रत्येक ईपीएफ अकाऊंटवर ७ लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा प्राप्त होतो. या योजनेमध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचे योगदान देण्याची गरज नाही.

यापूर्वी याची मर्यादा ६ लाखापर्यंत होती. मागील वर्षात सप्टेंबर २०२० मध्ये याचे मर्यादा वाढवून ७ लाखापर्यंत करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केव्हा आणि कसा मिळवता येईल योजनेचा लाभ (क्लेम)?

या रक्कमेचा दावा करण्यासाठी वारसदारांकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने,  दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दावा करता येतो. यामध्ये एकरक्कमी पैसे देण्यात येते. याशिवाय ग्राहकाला जिवन विमा सुद्धा मोफत लाभ मिळतो. यासाठी ग्राहकाला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ खात्यासोबत जोडण्यात येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि बँक खात्याचे प्रमाणित पत्र देण्याची गरज आहे. हा लाभ मिळविण्यासाठी कोविड-१९ ने होणाऱ्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा याचा लाभ मिळविता येतो. जर नोकरदाराचा कुणीच वारसदार नसेल तर कायदेशीर वारसासाठी दावा करता येतो.

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी नोकरदाराकडे जमा होणाऱ्या फॉर्मसोबत विमा प्राप्त करण्यासाठी फॉर्म-५ आयएफ सुद्धा जमा करावा लागतो. यानंतर संपूर्ण दिलेल्या दस्ताऐवजाची पडताळणी करून यानंतर नोकरदारांना याचा लाभ मिळतो.

सध्या ईपीएफमध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम जमा होते. एम्प्लॉयर सुद्धा १२ टक्के जमा करतो परंतु ती दोन भागात जमा होते. कंपनी ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करण्यात येते.

हे देखील वाचा :

आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिकेत ३०० जागांसाठी भरती

Comments are closed.