Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांच्या भरतीसाठी मुदतवाढ

पात्र आणि इच्छुक उमेदवार ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

igcar

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात सायंटिफिक ऑफिसर/इ या पदासाठी १ जागा, टेक्निकल ऑफिसर/ इ या पदासाठी १ जागा, सायंटिफिक ऑफिसर/ डी या पदासाठी ३ जागा, टेक्निकल ऑफिसर/ सी या पदासाठी ४१ जागा, टेक्निशियन/ बी (क्रेन ऑपरेटर) या पदासाठी १ जागा, स्टेनोग्राफर ग्रेड-३ या पदासाठी ४ जागा, उच्च श्रेणी लिपिक या पदासाठी ८ जागा, ड्राइव्हर (ओजी) या पदासाठी २ जागा, सिक्योरिटी गार्ड या पदासाठी २ जागा, वर्क असिस्टंट या पदासाठी २० जागा, कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी १५ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-१ या पदासाठी ६८ जागा, स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-२ या पदासाठी १७१ जागा अशा एकूण ३३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नोकरीचे ठिकाण कल्पाक्कम, तमिळनाडू येथे आहे.

या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-शिक्षण कॅटेगरी बघा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

१) पद क्र.१- १) पीएच.डी. (मेटलर्जी/ मटेरियल इंजिनिअरिंग) २) ६०% गुणांसह बी.टेक (मेटलर्जी)/ एम.एससी (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) २) ४ वर्षे अनुभव

 २) पद क्र.२-१) ६०% गुणांसह बीइ/बी.टेक (केमिकल) २) ९ वर्षे अनुभव

 ३) पद क्र.३- पीएच.डी/ ६०% गुणांसह बी.इ/ बी.एससी/ एम.एससी/एमइ

 ४) पद क्र.४- ६०% गुणांसह एम.एससी. / एम.टेक / बी.इ./ बी.टेक/बीएससी

 ५) पद क्र.५-१) ६०% गुणांसह १०वी/१२वी (पीसीएम) उत्तीर्ण २) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र २) अवजड वाहन चालक परवाना

 ६) पद क्र.६- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) शॉर्ट हैंड ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.

 ७) पद क्र.७-५०% गुणांसह पदवीधर ९) पद क्र.९-१०वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र १०) पद क्र.१०-१०वी उत्तीर्ण

 ८) पद क्र.८- १)१०वी उत्तीर्ण २) हलके व अवजड वाहन चालक परवाना ३) ३ वर्षे अनुभव

 ११) पद क्र.११-१०वी उत्तीर्ण

 १२) पद क्र.१२- ६०% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/ सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री/ फिजिक्स)

 १३) पद क्र.१३- ६०% गुणांसह १०वी/ १२वी (पीसीएम) उत्तीर्ण +आयटीआय (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्टुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/ आरइएफएफ अॅन्ड एसी/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा १२वी (पीसीएम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 वयोमर्यादा

पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाया उमेदवाराचे वय १८ ते ४० वषे, पद क्र.४ साठी १८ ते ३५ वर्षे, पद क्र.५ आणि ११ साठी १८ ते २५ वर्षे, पद क्र.६ ते १० साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.१२ साठी १८ ते २४ वर्षे, पद क्र.१३ साठी १८ ते २२ वर्षे असावे.

 शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून पद क्र.१ ते ४ साठी ३०० रूपये, पद क्र.५ ते ११ आणि १३ साठी १०० रूपये, पद क्र.१२ साठी २०० रूपये शुल्क आकारले जाईल.

 अधिक माहितीसाठी

इंदिरा गांधी अणुसंशोधन दाच्या अधिकृत वेबसाइट http://www.igcar.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हे देखील बघा : 

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

Comments are closed.