Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेमासाठी वाटेल ते ! तीन मुलांची आई सातवीतल्या मुलासोबत फरार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेश दि 13 मार्च :- प्रेम आंधळ असतं असे म्हणतात प्रेमात पडलेल्या व्यक्तीला कशाचंच भान राहत नाही.हे सिद्ध करणारी एक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे .येथे प्रेमात पडलेली तीन मुलांची आई चक्क सातवीतल्या मुलासोबत फरार झाली आहे .नवभारत टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गोरखपुर येथील कॅम्पीअरगंज गणपती येथे घडली आहे .

येथील एका माणसाने आपली पत्नी चमेली (नाव बदललेले) हे फरार झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. त्याच्या तक्रारीनुसार चमेली गावातीलच एका 14 वर्षाच्या मुला सोबत फरार झाली आहे .त्याच्या म्हणण्यानुसार चमेलीला तीन मुले आहेत. ज्या मुलासोबत पळून गेली आहे  हा मुलगा सातवी इयत्तेचा विद्यार्थी आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या काही महिन्यापासून चमेली आणि त्या मुलांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. तिच्या बदललेल्या वागणं पतीला संशय येत होता .यावरून त्यांच्या घरात रोज वादही होत असत. गावात महाशिवरात्र निमित्त एक जत्रा भरली होती .त्याच जत्रेत चमेली तिच्या प्रियकरासोबत गेली होती. मात्र तिथून परतली नाही .चमेली च्या नवऱ्याने तिचा रात्रभर शोध घेवून घेऊन पाहिला .त्यानंतर त्यांनी पोलिसात तिच्या फरार होण्याविषयी तक्रार दाखल केली.

दुसरीकडे चमेलीच्या प्रियकर असलेल्या मुलाच्या घरीही त्याचा बेपत्ता झाल्याची माहिती कळली. त्याच्या कुटुंबाच्या मते या महिलेनेच त्याच्या मुलाला भुरळ पाडून आपल्या सोबत पळून जायला भाग पाडलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनीही तक्रार दाखल केली आहे. पोलिस फरार जोडी चा शोध घेत आहेत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.