Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर गुजरात निवडणुकीचा वाजला बिगुल

1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात होणार निवडणूक, 8 डिसेंबरला होणार निवडणूकीचा निकाल घोषित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गुजरात, 03 नोव्हेंबर :- गुजरात राज्यात 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. याबाबत केद्रीय निवडणूक आयोगाने आज गुरूवारी पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला घोषित होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजारात विधानसभेत 182 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 89 आणि दुसर्या टप्प्यात 93 जागांवर निवडणूक होणार आहे. 50 टक्के मतदान केद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केद्रीय निवडणूक आयोगाने दिली. 51,782 मतदान केंद्र असून प्रत्येक बुथमध्ये सरासरी 948 मतदार आहेत.

182 सदस्सीय विधानमंडळासाठी ही निवडणूक होत आहे. गुजरात विधानसभेचा कार्यकाल पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यानुसार या निवडणूका घोषित करण्यात आल्या आहेत. 10 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 4.04 लाख पीडब्ल्यूडी मतदार आहेत. 9.8 लाख 80 पेक्षा ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख प्रथमच मतदाना हक्क बजावणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबर 2022 आणि दुसर्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबर 2022 असा अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. पहिल्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर आणि दुसर्या टप्प्यासाठी 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्यात येउ शकते. भाजप गेल्या 27 वर्षापासून गुजरातमध्ये सत्ते आहे आणि पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.