Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडला

केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

केरळ डेस्क 26 फेब्रुवारी:– केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रेल्वेच्या ज्या सीटखाली ही स्फोटक मिळाली, तिथे एक महिला बसली होती. ही महिला चेन्नई ते थालास्सेरी असा प्रवास करत होती. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या महिलेने स्फोटक आणली का? याचा तपास पोलिस करत आहे.

Comments are closed.