रॉबर्ट वाड्रां राजकारणात एन्ट्री करणार!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जयपूर, 26 फेब्रुवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा देखील राजकारणात येणार आहेत. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत. वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
‘ED ला जितके प्रश्न विचारयाचे आहेत, त्यावर मी उत्तर देईल. मला आता पुन्हा चौकशीला बोलवण्याचं काहीही कारण नाही. गेल्या 25 वर्षात आपण राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही विचार केला नव्हता. मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी घराच्या बाहेर पडल्यानंतर आपला वापर केला जातो. मी आता राजकारणात येणार आहे.’ असं वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं. वाड्रा यांच्या या घोषणेनंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर गांधी घराण्याशी थेट संबंध असलेली चौथी व्यक्ती आता लवकरच राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Comments are closed.