Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीचे छत कोसळून, 18 जणांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • गाझियाबाद मुरादनगर श्मशान घाट येथील घटना.
  • अंतिम संस्कार ला गेले असता झाली घटना.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दिल्ली डेस्क 03जानेवारी :-दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये आज सकाळपासून झालेल्या पावसामुळे मुरादनगर परिसरातील स्मशानभूमीत छत पडले. सीएमएस अनुराग भार्गव यांच्या माहितीनुसार, या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यामधून 30 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आयजी मेरठ झोन प्रवीण कुमार म्हणाले की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वास्तविक, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी या छताखाली उभे असताना हा अपघात झाला. अचानक छत कोसळल्याने आसऱ्यासाठी आलेले लोक छताखाली दबले. याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिस व अन्य पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य राबवले. मिळालेल्या माहितीनुसार या स्मशानभूमीचे छत चार महिन्यांपूर्वी बांधले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. विभागीय आयुक्त, मेरठ आणि एडीजी मेरठ झोन यांना घटनेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. छत पडण्याच्या घटनेची दखल घेत सीएम योगी यांनी जिल्हा दंडाधिकारी व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना तातडीने घटनास्थळी पोहचून मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.