Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) एक खास मोहीम सुरू केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 09 जानेवारी :–  कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेकांमध्ये आरोग्याबाबत जागृती वाढली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा निगमनं या सर्वांसाठी एक खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिनेनुसार एखादी बंद पडलेली LIC पॉलिसी देखील पुन्हा सुरु करता येईल. 7 जानेवारी ते 6 मार्च या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एखादी पॉलिसी काही कारणांमुळे बंद पडली असेल तर त्या पॉलिसीधारकांना आणखी एक संधी या योजनेत मिळणार आहे. अर्थात त्यासाठी काही अटींचं त्यांना पालन करावं लागेल. LIC नं या मोहिमेसाठी खास 1,526 कार्यालयांची निवड केली आहे. त्या कार्यालयामध्ये ही पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मेडिकल टेस्टची गरज नसेल.

अटी जाणून घ्या :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

LIC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्यांची पॉलिसी पेमेंट न केल्यामुळे मागील पाच वर्षात बंद पडली आहे, अशा पॉलिसीधाराकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर त्यांची तब्येत लक्षात घेऊन काही सवलती देखील दिल्या जातील. मात्र Covid-19 संबधीच्या काही प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.