Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

10 वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोवा, 27 फेब्रुवारी : मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा (HQ 2 Signal Training Centre – Goa) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Headquarters 2 Signal Training Centre Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

उपकरणे दुरुस्त करणारा & एम टी एस (माळी) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Goa) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2022 असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव : 

उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer)

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एम टी एस माळी (MTS Gardener)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना लेदर, टेक्सटाईल आणि बुटांशी निगडित सर्व कामं करण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एम टी एस माळी (MTS Gardener) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी माळी काम करण्याचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उपकरणे दुरुस्त करणारा (Equipment Repairer) – 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक.

एम टी एस माळी (MTS Gardener) – 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : 

कमांडंट, मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, पणजी, गोवा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.

 

Comments are closed.