Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदियाच्या बिर्शी विमानतळा वरून १३ मार्च ला उडणार पहिला प्रवाशी विमान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
विशेष प्रतिनिधी – सचिन कांबळे 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  • खा प्रफुल पटेलांना देखील झाला आनंद. 
  • माजी केंद्रीय उद्यान मंत्री प्रफुल पटेलांनी २००६-०७ मध्ये विमानतळ बांधकामाला केली होती सुरवात. 
  • मागील १० वर्षा पासून बिर्शी विमानतळावर उतरत होते फक्त खा प्रफुल पटेल आणि काही खाजगी व्यक्तींचे प्लेन आणि चॉपर. 

गोंदिया, दि. २७ फेब्रुवारी : गोंदिया शहराला लागून असेलला बिर्शी विमानतळावरं १३ मार्च २०२२ पासून प्रवाशी विमान वाहतुकिला सुरवात होत असून माजी केंद्रीय उद्यान मंत्री खा. प्रफुल पटेल यांनी देखील या संदर्भात आनंद व्यक्त करीत गोंदियाकरांंना शुभेक्षा दिल्या आहेत. मागील १० वर्षा पासून गोंदियाचा बिर्शी विमानतळ बनून पूर्णत्वास आला असला तरी आज पर्यंत या विमानतळाचा फायदा फक्त मोजक्याच व्हीआयपी लोकांना झाला होता. मात्र आता गोंदिया भंडारा जिल्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्ननातून लवकरच या विमानतळाचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंदिया शहराला पासून साधारणत : २० किलो मिटर अंतरावर बिर्शी गावात ब्रिटिश कालीन विमानतळ होत .मात्र इंग्रजांनी भारत सोडून गेल्यावर या ठिकाणी असलेले विमानतळ हे पूर्णतः नासधूस झाले होते .मात्र गोंदियातील दिगज नेते अशी ओळख असलेले खा प्रफुल पटेल यांनी केंद्रात उद्यान मंत्री होताच. या ठिकाणी नवीन एकरपोर्ट बांधकामाला मान्यता दिली असून २००६-०७ मध्ये या ठिकाणी सुसज विमानतळ उभारण्यात आले होते.

गेल्या १० वर्षा पासून या विमानतळाचा फायदा मोठ्या दिग्ज नेत्यांना किंवा व्हीआयपी लोकांचा होत होता. मात्र २०१९ मध्ये निवडून आलेले खासदार सुनील मेंढे यांनी हा विमानतळ सामान्य जनतेच्या कामी यावे या साठी केंद्र सरकारशी वारंवार पत्र व्यवहार करीत केंद्रीय उद्यान मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या साथ घेत उडान योजने अंतर्गत प्लाय बिग एयर लाईन्स च्या माध्यमातून १३ मार्च पासून गोंदिया ते इंदोर -हेंद्राबाद अशी प्रवाशी वाहतूक विमान सेवा सुरु करण्याचे ठरविले असून पहिल्या बुकींग मध्ये आलेल्या ३६ लोकांना फक्त १९९९ रुपया मध्ये हा विमान प्रवास करता येणार आहे. तर उर्वरित ३६ लोकांना फक्त २६०० रुप्याच्या आत ह्या विमान सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र गोंदिया ते मुबई ओरंगाबाद अशी जर विमान सेवा सुरु झाली असती तर याचा फायदा अधिक जास्त झाला असता असे मत खा प्रफुल पटेल यांनी व्यक्त करीत गोंदियातील जनेतला सुमभेक्षा दिल्या आहेत.

तर १३ मार्च ला केंद्रीय उद्यान मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर विमानतळा वरून व्हर्चूवल पद्धतीने या विमान सेवांचा उदघाटन करण्यात येणार असून इंदोर ते गोंदिया १ तास १५ मिनटात तर इंदोर ते हेंद्राबाद १ तास ३० मिनटात प्रवास करता लागणार आहेत तर १ मार्च २०२२ पासून या विमान सेवेच्या तिकीटा बुक करण्यात येतील तर दर दिवशी सकाळी ७ वाजून १० मिनिटाला इंदोर वरून गोंदिया करिता विमान असेल, तर ८ वाजून १५ मिनीटांनी गोंदियात पोहचेल तर ८ वाजून ४५ मिनिटांनी हेंद्राबाद ते इंदोर अशी विमानाची वेळ असेल,  तर येत्या काही महिन्यात गोंदिया ते मुबई पुणे देखील ह्या विमान सेवा सुरु करण्यात येईल अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली असून जे खासदार सुनील मेंढे याना जमले ते माजी उद्यान मंत्री प्रफुल पटेलांना का जमले नाही असा प्रश्न गोंदियाकराना पडला असून देर से हि शही मात्र प्रफुल पटेलांनी बांधललेला विमानतळ गोंदियाकरना नक्की कामी पडेल हे मात्र निश्चित.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

 

Comments are closed.