Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

वनविभागाला पडला अद्ययावतीकरणाचा विसर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मिलिंद खोंड, सचिन कांबळे. 

गडचिरोली, दि. २६ फेब्रुवारी :  शासनाचे बहुतांश विभाग अद्यायावत झाले असतांना वनविभागाला अद्यायावतीकरणाचा स्पर्शही झालेला दिसत नाही. या विभागाच्या संकेतस्थळावर दीर्घकाळापासून माहिती अद्यायावत न करण्यात आल्याने आजही या ठिकाणी सेवानिवृत्त व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचीच नावे आणि छायाचित्रांचा बोलबाला दिसत आहे. त्यामुळे या सावळ्या गोंधळामुळे कोणता अधिकारी नेमका कोणत्या विभागात कार्य करतो हे कळायला मार्ग नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र वन विभागाच्या संकेतस्थळाची राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राद्वारे डीझाइन, विकसित आणि देखभाल केली जाते.

वन विभागाच्या संकेतस्थळावर एका क्लिकवर वनविभागाच्या कार्याबद्दल माहिती, बातम्या, अद्यतने, ई-निविदा, माहिती अधिकार, संपर्क तसेच वन विभागाच्या विविध विषयाशी निगडीत माहिती मिळते मात्र संपर्क या श्रेणीत भेट दिल्यानंतर ते अद्यायावत नसल्याचे दिसून येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली वनविभागातील काही अधिकाऱ्यांची बदली होऊन तर काही अधिकारी सेवानिवृत्त होऊन अनेक महिने लोटले तरीही त्यांचा नावाचा तपशील संकेतस्थळावर हटवलेला नाही. त्यांच्या जागी आलेला नवीन अधिकारी कोण? कोणाकडे अतिरिक्त कार्यभार हे देखील नमूद नाही.

वनविभागाच्या संकेतस्थळावर गतवर्षी ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झालेले आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे यांचे नाव व छायाचित्र आजही संकेतस्थळावर कायम आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) एच. जी. मडावी हे सुध्दा सेवानिवृत्त होऊन वर्ष लोटत आले तरी त्यांचे नाव आणि छायाचित्र आजही कायम आहे.

भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक म्हणून सिद्धेश सावर्डेकर यांची बदली होऊन बराच कालावधी लोटून गेला तरी यांचे नाव व छायाचित्र आजही संकेतस्थळावर कायम आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक वनसंरक्षक (प्रोबेशनरी) म्हणून नितेश देवगडे यांचे नाव व छायाचित्र आजही संकेतस्थळावर कायम आहे. जेव्हा की, ते आलापल्ली वनविभागात उपविभागीय वनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे संपर्क या श्रेणीत अधिकाऱ्यांची माहिती शोधली असता परिपूर्ण माहिती उपलब्ध नाही.

त्यामुळे सेवानिवृत्त व बदली झालेल्या यांच्या जागी कोणता अधिकारी कार्यरत आहे. यांचे नाव शोधूनही सापडत नाही. त्यामुळे संकेतस्थळावर संपर्क शोधण्यासाठी घोर निराशा होते. एकीकडे ई-निविदा व विविध माहिती अद्ययावत करण्यासाठी वनविभागाला वेळ मिळते मात्र आपल्या विभागातीलच कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी वेळ मिळत नाही का? असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो.

गडचिरोली वनवृत्तात येत असलेल्या आलापल्ली वनविभागात ७ वनपरिक्षेत्र, ३१ क्षेत्र तर १६६ नियतक्षेत्र आहेत. भामरागड वनविभागात ५ वनपरिक्षेत्र, ३३ क्षेत्र तर ११० नियतक्षेत्र आहेत. सिरोंचा वनविभागात ८ वनपरिक्षेत्र, ३१ क्षेत्र तर १७५ नियतक्षेत्र आहेत. गडचिरोली वनविभागात ९ वनपरिक्षेत्र, ३७ क्षेत्र तर १५० नियतक्षेत्र आहेत. वडसा वनविभागात ८ वनपरिक्षेत्र, ३४ क्षेत्र तर १३५ नियतक्षेत्र आहेत. असे एकूण गडचिरोली वनवृत्तात ३७ वनपरिक्षेत्र, १६६ क्षेत्र तर ७३६ नियतक्षेत्र आहेत. असा आलेख आहे.

त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वनविभाग आपल्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यासाठी दुर्लक्षच करीत आहे असे संकेतस्थळावर तपासतांना आढळते.

हे देखील वाचा : 

आलापल्ली वनविभागात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

 

Comments are closed.