Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; २१ ऑगस्टपर्यंत दिलासा

वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर  यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली – वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर  यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सुनावणी पार पडली.

सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना तात्काळ अटक करण्याची गरज नाही. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा ,

गडचिरोलीत ट्रकच्या चाकाखाली गेल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.