Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

24 तासांमध्ये देशभरात अवघ्या 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 08 जून :- देशात गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग हा थोडा मंदावताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ८६,४९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २१२३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २,८९,९६,४७३ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात ३,५१,३०९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत अनेक दिवसांनंतर ११ हजारांच्या खाली नवे रूग्ण आढळले आहेत.  राज्यात १०,२१९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन २२,०८१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  ९५.२५% झाले आहे.  तर मुंबईत ७२८ नवे रूग्ण आढळले आहेत. ९८० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

हे पण वाचा:- देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता! 

Comments are closed.