Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: स्फोट करून उडवली जवानांची बस, ५ शहीद तर ९ जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नारायणपूर, २३ मार्च : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस नक्षल्यांनी स्फोट करुन उडवली आहे. एकूण ९० जवान या बसमधून प्रवास करत होते. या घटनेत ५ जवान शहीद झाले असून ३ जण गंभीर जखमी तर ९ जखमी आहेत. ३ गंभीर जखमींना हेलिकॉप्टर द्वारे पुढील उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे. ९ जखमींचे नारायणपूरच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

हा स्फोट IED लावून छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये करण्यात आलेला आहे. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) ५ जवान शहीद झाले. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

शहीद जवानाचे नावे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • पवन मडावी – प्रआर
  • जयलाल उईके – प्रआर
  • सेवक सलाम – आरक्षक  
  • करन देहारी – आरक्षक चालक
  • विजय पटेल – सहायक आरक्षक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.