शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन
वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई: पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं आज वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. खान यांची सून नम्रता गुप्ता-खान यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर ,एआर रहमान आणि राज्यपाल यांनी शोक व्यक्त केला आहे.
संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. खान यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांनी खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. महान शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहेब यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी कळली. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झालं.
पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या बहुविध योगदानामुळे भारतीय शास्त्रीय संगीत विश्व समृद्ध केले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी उत्तमोत्तम शिष्यांच्या पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनामुळे एक महान शास्त्रीय संगीतकार व तितक्याच थोर व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहो. दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, चाहते तसेच शिष्यांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Comments are closed.