Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

लाहोर डेस्क 08 जानेवारी : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने आज कोर्टाने त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलीस शोध घेत होती. भारत सरकारने त्याला सप्टेंबर 2019मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. तर UNSC मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 26/11च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनेच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचं उघड झालं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.