Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग: मुख्यमंत्र्याचा ताफा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडविला.. गाडीतून उतरून साधला संवाद

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी नजीक असलेल्या गोदीखुर्द धरणाच्या कालव्याची पाहणी करायला आले होते.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 08 जानेवारी :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी निघाले होते, तितक्यात रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त थांबलेले पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि संवाद साधला. गेल्या 35 वर्षांपासून शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली . 31 हजार कोटी रुपये खर्च करुनही शेती तहानलेली असल्याची खंत व्यक्त केली. ठाकरे यांनी गाडीखाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सकाळी त्यांनी गोसीखुर्द धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या 36.76 किलोमीटरवरुन घोडाझरी शाखा कालवा सुरु होतो. त्याची एकूण लांबी 55 किलोमीटर आहे. या कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके येतात. त्यात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल आणि सावली तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यांमधील 19 गावांमध्ये 2 हजार 906 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या 3 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन करा, अशा सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाला लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावं. तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed.