कंगना आणि तिची बहिण वांद्रे पोलीस स्टेशनला हजर
मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मुंबई डेस्क, 08 जानेवारी :– राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघी आपला जबाब नोंदवायला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आहेत. 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. पण, आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.
दुपारी साधारण 1 च्या सुमारास कंगना आणि तिची बहिण रंगोली तिच्या घरातून वांद्रे पोलीस स्टेशन करता रवाना झाल्या होत्या. 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगना चौकशीला हजर राहिली नव्हती. तर वांद्रे कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून सरंक्षण देवून आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगना आणि तिची बहीण वांद्रे पोलीस स्टेशन येथे जबाब नोंदवायला हजर आहे.
वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसंच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती. पण कधी नातेवाईकांच्या लग्नाचे तर कधी कोविड -19 चे कारण देत कंगणा पोलीस स्टेशनच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती आणि थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
Comments are closed.