Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेताच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडून केली चितळाची शिकार, तिघांना अटक

  • मोसम  गावातील महेश गंगाराम पोरतेट यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता चितळाला कापत असल्याचे आले आढळून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ०८ जानेवारी: शेतात विजेचे तार लावून चितळाची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना मोसम या गावातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील आलापल्ली पासून 12 किमी अंतरावर असलेल्या मोसम  गावातील महेश गंगाराम पोरतेट यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता चितळाला कापत असल्याचे आढळून आले. पोरतेट यांच्यासोबत रमेश मल्ला कुडमेथे रा. मोसम व संजय किष्टय्या  वेलादी रा. कमलापूर हे सुद्धा आढळून आले. त्यांच्या या घटनेत सहभाग असल्याचे दिसून आल्याने तिघांनाही अटक करण्यात आली. चितळाचे डोके, पाय, मांस व कापण्याकरिता वापरण्यात आलेली अवजारे कुऱ्हाड, वासला, कोयता आणि सुरा आदी हत्यार ताब्यात घेण्यात आले.

त्यांची अधिक चौकशी केली असता, मोसम या क्षेत्रातील खंड क्रमांक 649 ला लागून असलेल्या महेश गंगाराम पोरतेट यांच्या शेतीचा कुंपणाला लोखंडी अर्थिंग तारेचे फासे लावण्यात आले होते. त्यामध्ये चितळ ठार झाला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सी. वाय. तोंबर्लावर, एन. वडेट्टीवार, के. आर. पारचाकी, एस. एम. धात्रक, डी. एस. गजबे, पी. यू. गेडाम, अल्विन उप्पल, पी. एम. नंदगिरीवार, एन.ए. मादेशी, एच. जी. कुमरे, डी.डी. मालगाम, रसिका मडावी, साधना आत्राम यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या गुन्ह्यातील रमेश मल्ला कुळमेथे यांच्याविरोधात यापूर्वीही वनगुन्हा दाखल आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.