नवीन वर्षाच्या सुरुवातील मात्र सोन्याच्या भाव काहीसा घसरला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 01 जानेवारी :- नवीन वर्षाच्या सुरुवातील मात्र सोन्याच्या भाव काहीसा घसरला आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरु आहेत. चांदीचा दरही प्रती किलोग्रॅममागे घसरला आहे. जळगाव सराफा बाजारात आजचा (1 जानेवारी) सोन्याचा दर 51,480 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 69,821 रुपये प्रति किलो इतका आहे. सोन्याच्या भावात 28 रुपये तर, चांदीच्या भावात 494 रुपये इतकी घसरण आली आहे. नवीन वर्षाचा मुहूर्त साधून तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल, तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोने आणि चांदीचे दर…
गेल्या तीन दिवसांतील सोने-चांदी दर
1 जानेवारी
सोने – 51,480 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,821 रुपये प्रति किलो
31 डिसेंबर
सोने – 51,508 रुपये प्रति तोळा
चांदी – 70,315 रुपये प्रति किलो
30 डिसेंबर
सोने – 51,407 रुपये प्रति तोळा
चांदी – 69,769 रुपये प्रति किलो
29 डिसेंबर
सोने – 51,418 रुपये प्रति तोळा
चांदी -70,519 रुपये प्रति किलो
मुंबईतील भाव आजचा
गुड रिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, मुंबईत आज सोन्याचा दर 49, 930 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
नागपूर भाव आजचा
नागपूर आज सोन्याचा दर 49, 940 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
नव्या वर्षात सोन्याचा भाव वधारण्याची शक्यता
गुंतवणूक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच, आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर देखील कमी केला आहे.
Comments are closed.