Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

NIAची देशभरात मोठी कारवाई.

महाराष्ट्रातील नांदेड व कोल्हापूर सह ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून संशयितांना अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 1 ऑगस्ट   :-  राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेकडून देशातील सहा राज्यांतील एकूण १३ संशयितांचे घर तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात एनआयएने ही कारवाई केली आहे. नांदेड शहरातील इतवारा भागातील चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात एनआयएने कारवाई केली आहे. या छाप्यात कागदपत्रे तसेच संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..https://youtube.com/watch?v=AU7ith2wVjk&feature=share

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.