प्रजासत्ताकदिनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर टीम 360 एक्सप्लोरर मार्फत फडकला तिरंगा
360 एक्सप्लोरर टीमचे अनिल वसावे यांनी केले शिखर सर
अनिल वसावे हा नंदुरबार मधील पहिला आदिवासी मुलगा
नंदुरबार, दि. २७ जानेवारी: प्रजासत्ताकदिनानिमित्त 360 एक्सप्लोर ग्रुप द्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या युवकाने इतिहास घडवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून मोहीम यशस्वी केली आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता नंदुरबार येथील अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला आहे. आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे.
अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 19 जानेवारी रोजी सुरवात केली होती. असा आगळावेगळा व देशाला अभिमानास्पद विक्रम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. येत्या काळात अनिल वसावे ३६० एक्स्प्लोरर च्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत.
Comments are closed.