Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोदी सरकार हे 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार; काँग्रेसची टीका

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेसने त्यावर सडकून टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकालातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार आहे असं कांग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “देशाला एका बिनकामी आणि दुर्बल सरकारचं ओझं वाहताना आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे परिणाम देश भोगतोय कारण या सात वर्षाच्या कालावधीत बेरोजगारी 11.3 टक्क्यांनी वाढलीय. अनेक भागात पेट्रोल 100 रुपयांवर गेलं आहे तर खाद्य तेलाच्या किंमती 200 रुपयांवर गेल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गेल्या 73 वर्षाच्या इतिहासाती सर्वात दुर्बल सरकार आहे.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.