Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक

केंद्र सरकार करीत असलेल्या सहकार्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या  प्र्यत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येण शक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.