Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज चे सोने-चांदीचे दर

Get real time updates directly on you device, subscribe now.

दोन दिवसांपासून सोने दर वधारत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क १६ डिसेंबर:- सोने-चांदीला पुन्हा तेजी आली आहे. दोन दिवसांपासून सोने दर वधारत आहे. सोने दरातील हा मोठा चढ-उतार कधीपर्यंत राहील याबाबतचा अंदाज बांधणं कठीण आहे. तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक करु इच्छित असाल तर त्या दराबाबत जागरुक असणं आवश्यक आहे. बुधवारी 16 डिसेंबरला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी दहाच्या सुमारास सोने दरात 107 रुपयांची वाढ होऊन, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49550.00 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात 324 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीचा प्रतितोळ्याचा भाव 65177 रुपयांवर पोहोचला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रातील सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात आजचे सोन्याचे भाव 50 हजार 600 प्रतितोळे इतका आहे. तर जळगाव सराफ बाजारात चांदी 66 हजार 370 रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. राजधानी दिल्लीतही सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सोने दरात 514 रुपयांची वाढ झाल्याने तोळ्याचा भाव 48,847 रुपयांवर पोहोचला. तर चांदी दरात 1,046 रुपयांची वाढ होऊन किलोचा भाव 63,612 रुपयांवर पोहोचला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत थेट 50 हजारांच्याही खाली घसरली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.